मुंडीपार - एक गाव बारा भानगडी...
मुंडीपार... सामाजिक सौख्य प्रदान असलेलं एक स्वतंत्र भारताच्या महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे हे गाव... छोटेसेच, पण विविधतेने नटलेले असे गाव... विविधतेने म्हणजे असे काही स्तुत्य तर नाहीच... पण ह्या गावाचा सामाजिक, धार्मिक वारसा हा खूप मोलाचा... इथे अनेक विचारवंत होऊन गेले, या मातीत घडले... पंचक्रोशीत त्यांची वाहवा झाली... असे हे गाव... शांतता सदैव नांदत असणारे गाव... हे खरे का ते खरे... काही खरे नाही बुवा... गावाचा मोठेपणा की गावकऱ्यांचा... गाव कशामुळे घडते ... तर गावकऱ्यामुळे... मोठेपणा वा छोटेपणा हा खरे म्हणजे गावकऱ्यांच्या आंतरिक मनाच्या मोठेपणामुळे ठरते... गावाचा हातखंडाच खूप भारी... कशात? तर छोट्या छोट्या गोष्टींना मोठे करण्यात... खरेच बुवा... मी खोटे कुठे बोलतोय... अर्धेअधिक आयुष्य गावात गेले... ब्र शब्दाने कुणाला बोलले नाही किंवा डोळे वटारून पाहिले नाही... हेच खुपले असेल कदाचित... होय ना... नाहीतर ज्यांची चूक नाही त्यांना तुम्ही शिक्षा देताय म्हणजे हे काय? आसुरी आनंद येतोय का? हो असेल कदाचित... शक्येय ते... कसलं आलंय पूर्वग्रहदु...