मुंडीपार - एक गाव बारा भानगडी...
मुंडीपार...
सामाजिक सौख्य प्रदान असलेलं एक स्वतंत्र भारताच्या महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे हे गाव... छोटेसेच, पण विविधतेने नटलेले असे गाव... विविधतेने म्हणजे असे काही स्तुत्य तर नाहीच... पण ह्या गावाचा सामाजिक, धार्मिक वारसा हा खूप मोलाचा... इथे अनेक विचारवंत होऊन गेले, या मातीत घडले... पंचक्रोशीत त्यांची वाहवा झाली... असे हे गाव... शांतता सदैव नांदत असणारे गाव... हे खरे का ते खरे... काही खरे नाही बुवा...
गावाचा मोठेपणा की गावकऱ्यांचा... गाव कशामुळे घडते ... तर गावकऱ्यामुळे... मोठेपणा वा छोटेपणा हा खरे म्हणजे गावकऱ्यांच्या आंतरिक मनाच्या मोठेपणामुळे ठरते...
गावाचा हातखंडाच खूप भारी... कशात? तर छोट्या छोट्या गोष्टींना मोठे करण्यात... खरेच बुवा... मी खोटे कुठे बोलतोय... अर्धेअधिक आयुष्य गावात गेले... ब्र शब्दाने कुणाला बोलले नाही किंवा डोळे वटारून पाहिले नाही... हेच खुपले असेल कदाचित... होय ना... नाहीतर ज्यांची चूक नाही त्यांना तुम्ही शिक्षा देताय म्हणजे हे काय? आसुरी आनंद येतोय का? हो असेल कदाचित... शक्येय ते...
कसलं आलंय पूर्वग्रहदुषित मन? सर्व तर आपलेच ना? खरेच का? मग आपल्यांनीच आपलाच केसांनी गळा कापण्याचा का प्रयत्न केला असावा बरे? काय चूक असावी, एका सुज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हा तर नव्हता ना तो? पण गुन्हा केलाय हे आम्हाला कसे माहित नसावे? व्यसनाधीन तर नाहीच ना...
मुंडीपार... फक्त एक गाव नव्हे... तर सदसदविवेकबुद्धीने स्वतंत्र न्यायव्यवस्था संचालित करत असलेले स्वतंत्र भारतातील स्वतंत्र गाव... एक गाव बारा भानगडी...
न्याय मिळेस्तोवर लेखणी थांबणार नाही बरे का? अहो कोण वाचेल हे सर्व? वाचलेच पाहिजेत का कोणी? वाचकांची संख्या येथे कुठे कमीय बुवा...
भेटू पुढे... एक गाव झपाटलेला ... ह्या भागात... सविस्तर वृत्त घेऊन...
थांबणार नाही... कलम... लेखणी... नव्हे शस्त्र...
लेखक... शिल्पकार नंदेश्वर...

Comments
Post a Comment